(मंडणगड / रत्नागिरी)
हातात लोखंडी पात्याचा चाकू घेऊन गावात फिरत नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल, असे कृत्य केल्याच्या आरोपावरून मंडणगड तालुक्यातील तिडे निमदेवाडी येथे एका २९ वर्षीय तरुणावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याकडून २० रुपये किमतीचा लोखंडी पात्याचा चाकू जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन नरेश मोहिते (वय २९, रा. तिडे निमदेवाडी, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी) हा १८ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १.५० वाजण्याच्या सुमारास गावात चाकू घेऊन फिरताना आढळून आला. त्याच्या या वर्तनामुळे नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल, असे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मंडणगड पोलिस ठाण्यातील पोहेकॉ विशाल विठोबा कोळथरकर यांनी फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून नितीन मोहिते याच्याविरोधात गुन्हा क्रमांक ११७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम १३५ अन्वये ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी घटनास्थळावरून लोखंडी पात्याचा चाकू जप्त केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास मंडणगड पोलिसांकडून सुरू आहे.


