(रत्नागिरी / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कारवांचीवाडी-पोमेंडी बुद्रुक येथे ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीची स्थापना करण्यात आली. यावेळी दत्ताराम केशव शिंदे यांची समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली.
दत्ताराम शिंदे हे सलग सात वर्षे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या फेरनिवडीनंतर ११ सप्टेंबर २०२६ रोजी त्यांच्या अध्यक्षतेखाली यावर्षीची समितीची पहिली सभा घेण्यात आली. या वेळी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले.
सभेला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, समिती सदस्य, बीट अंमलदार बाजीराव कदम, पोलिस पाटील तसेच उपस्थित ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी दत्ताराम शिंदे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


