(विल्ये / अमित कांबळे)
रविवार ३० नोव्हेंबर रोजी मौजे विल्ये बौद्धजन विकास कमिटी स्थानिक/मुंबई, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले महिला मंडळ, तसेच मानका आप्पा समिती, मिलिंद जलसा कलानिकेतन मंडळ आणि परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते कालकथित जयराम धाकू कांबळे यांना विल्ये बौद्धवाडी येथे शोकसभा आणि पुण्यानुमोदन कार्यक्रम निमित्ताने आदरांजली वाहण्यात आली.
पुण्यानुमोदनाचा हा कार्यक्रम त्यांच्या विल्ये येथील निवासस्थानी बौद्धाचार्य एन बी. कदम गुरुजी यांच्या माध्यमातून बौद्ध पूजापाठ विधी घेऊन नियोजित कार्यक्रम सदानंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सदर कार्यक्रमाचे प्रस्तविक देवदत्त प्रकाश कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन सुवेज सिताराम कांबळे यांनी केले.
सामाजिक कार्यकर्ते कालकथित जयराम धाकू कांबळे यांना आदरांजली वाहताना विविध गावातील प्रतिष्ठित पाहुणे मंडळींनी विशेषतः गाव मांजरे, डिंगणी, लाजूळ, पोचरी, वेतोशी, खरवते, धामणसे, मालगुंड, कोळीसरे,अशोक यादव (बौद्धचार्य) चवे तसेच वंचित बहुजन आघाडी रत्नागिरी तालुका अध्यक्ष राजन कांबळे, उपाध्यक्ष – वैभव यादव आणि मुंबईतील मंडळींनी उपस्थित राहून सामाजिक कार्यकर्ते कालकथित जयराम कांबळे यांच्या निर्भीड विचारांना सलाम केले.
त्यांच्या शोकसभेनिमित्त ग्राम सभा डिंगणी आणि मौजे विल्ये बौद्धजन विकास कमिटी मुबंई यांच्याकडून पाठविण्यात आलेल्या शोकसंदेशाचे वाचन आले. त्यानंतर सौ.सुकेशिनी कांबळे, रमेश कांबळे, ओवी जाधव, प्रकाश कांबळे, चंद्रकांत कांबळे तसेच सूत्रसंचालक सुवेज कांबळे आणि अध्यक्षीय भाषणातून सदानंद कांबळे यांनी जयराम कांबळे यांच्या जीवनप्रवासातील विविध निर्भीड पैलू उपस्थितांसमोर क्षण प्रसंगातून आठवणीतुन सांगितले. कार्यक्रमाच्या अखेरीस बौद्धाचार्य कदम गुरुजी यांनी अनित्यवादाचा सिद्धांत विविध उदारणाचे दाखले देऊन पटवून सांगितले.

