(राजापूर / तुषार पाचलकर)
पाचल गावचे उपसरपंच, ठेकेदार, सामाजिक कार्यकर्ते तसेच हॉटेल मैत्री बार अँड रेस्टॉरंटचे मालक आणि शिवसेनेचे ओणी व पाचल विभागप्रमुख श्री. आत्माराम सुतार यांच्या ‘हॉटेल निखिल लॉजिंग अँड बोर्डिंग’चा उद्घाटन सोहळा येत्या १२ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र राज्य क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या तसेच युवासेना कार्यकारिणी सदस्या अपूर्वा सामंत यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन व्यवस्थापक श्री. राधाकृष्ण मित्र मंडळ, दिवाळची वाडी यांनी केले आहे.
राजापूर तालुक्याच्या पूर्व विभागातील पाचल ही सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. परिसरातील जवळपास ४० ते ४५ गावांतील नागरिक दैनंदिन व्यवहारांसाठी या बाजारपेठेत ये-जा करतात. गेल्या काही वर्षांपासून मुंबईहून पुणे मार्गे कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची या मार्गावरील वर्दळही वाढली आहे. त्यामुळे पाचल बाजारपेठेचे महत्त्व अधिक वाढले आहे.
या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची राहण्याची गैरसोय होऊ नये आणि त्यांना सुसज्ज निवासाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘हॉटेल निखिल लॉजिंग अँड बोर्डिंग’ची व्यवस्था करण्यात आल्याचे मालक श्री. आत्माराम सुतार यांनी सांगितले. लॉजिंगच्या उद्घाटनासाठी आमदार किरण सामंत यांची उपस्थिती लाभत असल्याबद्दल आपण हे आपले भाग्य समजतो, असेही त्यांनी नमूद केले.
उद्घाटन सोहळ्यास शिवसेना तालुका अध्यक्ष दीपक नागले, राजापूर पंचायत समिती सभापती नंदिनी कदम, पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास सर, जि. प. सदस्या सिद्धाली मोरे, पंचायत समिती सदस्या अपेक्षा मासये, समीक्षा वाफेलक, पाचल गावचे माजी सरपंच अशोक सक्रे, माजी उपसरपंच किशोर नारकर, भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भास्कर सुतार, सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, ओझरचे माजी सरपंच व उद्योजक इब्राहिम लांजेकर, राजापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार, पाचल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आण्णा पाथरे, शिवसेना विभागप्रमुख शैलेश साळवी, अमर जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते मोहन गोसावी यांची उपस्थिती लाभणार आहे.


