(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्यातील पाचल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने संचालित सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, पाचल येथे नव्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले.
या निमित्ताने “सरस्वती विद्या मंदिर पाचल माजी विद्यार्थी वेल्फेअर असोसिएशन” च्या वतीने “विद्यार्थी स्वागत उपक्रम” राबविण्यात आला. पहिल्या दिवशी प्रशालेतील सुमारे ७०० विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे गुलाबपुष्प, पेन व चॉकलेट देऊन हार्दिक स्वागत करण्यात आले आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास माजी विद्यार्थी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र रेडीज, सचिव सुशील नारकर, खजिनदार संतोष वायकुळ, कार्यकारिणी सदस्य सुनील रेडीज, निलेश पाथरे, श्रीधर नारकर उपस्थित होते.
तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे, खजिनदार राजन लब्दे, सहसचिव किशोर नारकर, शाळेचे मुख्याध्यापक तानाजी देसाई, तसेच पर्यवेक्षिका खरात मॅडम यांचीही उपस्थिती लाभली.