(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील मराठा समाजाच्या अध्यक्षपदी सुजित शांताराम साळवी यांची नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मालगुंड येथे मराठा समाजाची नवीन कार्यकारिणी करण्याबाबतची बैठक नुकतीच घेण्यात आली. या बैठकीत सुजित साळवी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
सुजित साळवी हे उच्चशिक्षित असून त्यांनी मालगुंड ग्रामदेवता, श्रीराम मंदिर देवस्थान समिती तसेच शिक्षक संघटनेच्या अनेक महत्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांच्या निवडीमुळे मालगुंड मराठा समाजाला एक हुशार आणि कर्तृवावान अध्यक्ष मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तसेच त्यांच्या कणखर आणि कार्य तत्पर नेतृत्वामुळे समाजाच्या उन्नतीस नवी दिशा मिळणार असल्याने त्यांच्यावर मालगुंड येथील संपूर्ण मराठा समाजाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

