(राजापूर / तुषार पाचलकर)
सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत राहून विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजहितासाठी योगदान देणारे अरबाज नेवरेकर यांच्या कार्याची दखल घेत जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्य, शाखा लांजा यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. लांजा येथे आयोजित कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, क्रीडा तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यामध्ये अरबाज नेवरेकर यांच्या सामाजिक कार्याचा विशेष गौरव करण्यात आला.
अरबाज नेवरेकर हे सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सातत्याने कार्यरत आहेत. समाजातील गरजू घटकांसाठी तसेच सामाजिक हिताच्या विविध उपक्रमांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत त्यांचा हा सन्मान करण्यात आला. नेवरेकर यांना यापूर्वी तीन वेळा राष्ट्रीय आदर्श समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रसिद्ध व्याख्याते नितीन बानगुडे-पाटील यांनी उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
सन्मानाबद्दल भावना व्यक्त करताना अरबाज नेवरेकर म्हणाले, “हा सन्मान माझा नसून, माझ्या सामाजिक वाटचालीत मार्गदर्शन, सहकार्य आणि प्रोत्साहन देणाऱ्या प्रत्येकाचा आहे.” या सन्मानामुळे सामाजिक कार्यासाठी नवी ऊर्जा मिळाली असून, समाजहिताचे उपक्रम अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
जिजाऊ संस्थेने सामाजिक कार्याची दखल घेत केलेला हा गौरव नेवरेकर यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरला आहे. त्यांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत झालेल्या या सन्मानाबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.
या कार्यक्रमाला तहसीलदार प्रियंका ढोले, नगराध्यक्षा सावली कुरूप, उपनगराध्यक्ष मिलिंद (बाबा) लांजेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेंद्र कदम, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, माजी आमदार राजन साळवी, राजन देसाई, भाऊ वंजारे, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे, नगरसेवक यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमर राऊत यांनी केले.

