(देवरूख/ वार्ताहर)
देवरूख हायस्कूलचे विद्यार्थीप्रिय शिक्षक राहुल रमेश सप्रे यांचे आज (गुरुवारी) पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने देवरूख परिसरासह विद्यार्थी, शिक्षक, मित्रपरिवार आणि शिक्षण क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
राहुल सप्रे सर हे शांत, प्रेमळ, मनमिळाऊ आणि आपुलकीच्या स्वभावासाठी परिचित होते. विद्यार्थ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाची वार्ता समजताच देवरूख हायस्कूलमधील विद्यार्थी, शिक्षक, माजी विद्यार्थी तसेच मित्रपरिवारातून शोक व्यक्त करण्यात आला. एका प्रेमळ आणि विद्यार्थीप्रिय शिक्षकाला गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
राहुल सप्रे यांच्या अकाली निधनाने सप्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३ वाजता देवधामापूर येथील निवासस्थानातून अंत्ययात्रा निघणार आहे.

