(राजापूर / वार्ताहर)
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर तालुक्यात ‘सेवा अभियानाला’ उत्साहात सुरुवात करण्यात आली. विलये गावातील मेढेकरवाडी येथे नळपाणी योजनेचा शुभारंभ आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी विलये-मेढेकरवाडी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सेवा कार्यातील हा पहिला उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांच्या मूलभूत गरजा तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांना प्राधान्य देत या अभियानांतर्गत विविध सामाजिक आणि जनसेवा उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत हे सेवा अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून, विविध सामाजिक व जनसेवा उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. ‘सेवा हीच संघटनेची ओळख’ या भावनेतून जनतेच्या सेवेसाठी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.


