(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची वार्षिक सभा करबुडे हायस्कूल येथे उत्साहात पार पडली. या सभेत संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून, अरुण जाधव यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष : अरुण जाधव (आगरनरळ)
उपाध्यक्ष : प्रकाश मांडवकर (कुरतडे)
सचिव : महेंद्र कुवळेकर (करबुडे)
सहसचिव : पांडुरंग पाचकुडे (निवळी तिठा)
खजिनदार : सुभाष पाटील (खेडशी)
सदस्य : सिद्धी लांजेकर (न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे), एम. एस. थूळ (शिवार-आंबेरे), प्रेमदास पवार (कोतवडे), विनोद सांगावकर (गावडे-आंबेरे), चंद्रकांत माने (टेंभ्ये), श्रीशैल्य पुजारी (देऊड), अंजली पिलणकर (अ. के. देसाई विद्यालय, रत्नागिरी) आणि रूपाली सावंत-देसाई (नाणीज).
कार्यकारिणीची निवड झाल्यानंतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
२५ शाळांना ग्रंथालयासाठी पुस्तक संच भेट
सभेनंतर समकालीन प्रकाशन, पुणे यांच्या वतीने रत्नागिरी तालुक्यातील २५ शाळांना ग्रंथालयासाठी ३५ वाचनीय पुस्तकांचा संच भेट म्हणून प्रदान करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पुस्तक संचासाठी देणगी दिल्याबद्दल सुजाता परांजपे, समकालीन प्रकाशन, पुणे तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे सुशील जाधव यांचे मुख्याध्यापक संघाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

