(चिपळूण / वार्ताहर)
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी-चिंचघरी विद्यालयाने पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका गुणवत्ता यादीत विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी स्थान मिळवत शाळेचा नावलौकिक उंचावला.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कुमार संग्राम प्रकाश भंडारे यांनी राज्य गुणवत्ता यादीत आठवा क्रमांक पटकावत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा खोवला. त्यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी :
प्रचिती धनंजय कुंभार हिने ग्रामीण सर्वसाधारण गटातून जिल्हा गुणवत्ता यादीत 12 वा क्रमांक पटकावला. अब्दुल मेहबूब मुल्ला (30 वा), आर्यन रविंद्र करांडे (41 वा), ज्ञानदा सतीश खताल (96 वा) आणि स्वरा राम रहाटे (108 वा) यांनीही जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले.
आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी :
साहिल संजय पवार याने ग्रामीण सर्वसाधारण गटातून जिल्हा गुणवत्ता यादीत 17 वा क्रमांक मिळवला. तनिष्का सुरेश जाधव (19 वा), रिया राजेश कदम (29 वा), आर्यन संतोष कलकुटकी (37 वा), श्रेयांश अमित वनगे (53 वा), पुष्कराज रोहित गमरे (61 वा), प्रसाद अजित भोसले (64 वा), श्रुती प्रणय मोहिते (75 वा), कस्तुरी महेश महाडिक (107 वा) आणि सह्याद्री अविनाश जाधव (113 वा) यांनीही यश संपादन केले.
तालुका गुणवत्ता यादीत अनुष्का सुभाष दरंदले हिने ग्रामीण सर्वसाधारण गटातून दुसरा क्रमांक, अथर्व गणेश चाळके याने तिसरा क्रमांक, सुरज हरिश्चंद्र चौरसिया याने चौथा क्रमांक, तर अगस्ती सुरेश जाधव याने ग्रामीण अनुसूचित जाती गटातून प्रथम क्रमांक पटकावला.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयातील अधिकारी श्री. सम्राट विजय पाटील आणि स्वामींनी सामाजिक कौशल्य विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. स्वरा सावंत यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला.
या यशामागे विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. श्री. आनंद भुवड, श्री. सतीश पालकर, सौ. प्राजक्ता खेडेकर, कु. शर्मिला म्हादे, श्री. पुष्कर कानिटकर, कु. अश्विनी सावर्डेकर, सौ. स्मिता भालेकर, सौ. स्नेहल भोसले, सौ. श्वेता मोरे, श्री. अनंत डिके, श्री. मुसा काद्री आणि श्री. समीर पिलवलकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
पालक प्रतिनिधी श्री. राम रहाटे यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचे श्रेय मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक आणि त्यांच्या अथक परिश्रमांना देत शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. मुख्याध्यापक श्री. संजय वरेकर यांनी विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे हे यश मिळाल्याचे सांगत भविष्यातही गुणवत्तेची परंपरा कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमास श्री. सम्राट विजय पाटील, सौ. स्वरा सावंत, उपमुख्याध्यापिका सौ. सुलोचना जगताप, पर्यवेक्षिका सौ. सावंत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

