(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय, जाकादेवी येथील इयत्ता आठवीचा विद्यार्थी कु. शौर्य प्राची भीमराव पवार याने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शौर्यने तालुक्यात १० वा, तर रत्नागिरी जिल्ह्यात ६७ वा क्रमांक मिळवत गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या यादीत स्थान मिळवले आहे.
या यशामागे विद्यालयाचे मुख्याध्यापक नितीन मोरे आणि पर्यवेक्षक शाम महाकाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षिका सुवर्णा शिंदे आणि शिक्षक अमित बोले, शुभम सानप, संदेश सोनवडकर, अजिंक्य साळवी, आकांक्षा कदम यांचेही त्याला सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळाले. शौर्यच्या यशात त्याचे पालक श्री. व सौ. पवार यांचेही मोठे योगदान आहे.
शौर्यच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण संस्थेचे चेअरमन सुनील मयेकर, उपाध्यक्ष विवेक परकर, सचिव विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे, जाकादेवी विद्यालयाचे सीईओ किशोर पाटील तसेच सर्व संचालकांनी त्याचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

