(रत्नागिरी / वार्ताहर)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणासंदर्भात तसेच Special Intensive Revision (S.I.R) आणि BLA नियुक्ती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्रामगृह, माळनाका येथे ही बैठक पार पडली.
या बैठकीत पक्ष संघटनेचा सखोल आढावा घेण्यात आला. तसेच S.I.R प्रक्रियेची अंमलबजावणी, त्यातील महत्त्वाचे मुद्दे आणि BLA (Booth Level Agent) नियुक्ती संदर्भातील कार्यपद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित पदाधिकाऱ्यांना या प्रक्रियेत अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
रत्नागिरी शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते. आगामी काळात संघटनात्मक काम अधिक गतिमान करण्यावर भर देण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला.

