(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सकल हिंदू समाज साखरपा पंचक्रोशी आणि परशुराम सेवा संघ, साखरपा यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. २९ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळा आणि वटपौर्णिमेनिमित्त आयोजित करण्यात आलेले हे शिबिर सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत पार पडणार आहे.
सध्या रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा जाणवत असून, अशा परिस्थितीत रक्तदात्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते.
“तुमचे एक रक्तदान, कोणाच्यातरी आयुष्याला नवी संजीवनी देऊ शकते.”
या सामाजिक उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे आणि गरजू रुग्णांच्या सेवेसाठी मोलाचा हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

