(देवळे / प्रकाश चाळके)
रत्नागिरी जिल्ह्यासह घाटमाथ्यावरील विविध जिल्ह्यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र असलेल्या साखरपा एसटी बसस्थानकाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या नव्या इमारतीमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सोयीस्कर सुविधा उपलब्ध होणार आहेत.
पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या प्रयत्नांतून साकारलेल्या या बसस्थानकाच्या नव्या इमारतीमुळे साखरपा परिसरातील प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आली.
लोकार्पण सोहळ्यास देवरुख आगाराच्या व्यवस्थापक सौ. मधाळे, बापू शेट्ये, विष्णुशेठ रामाणे, संजयशेठ सुर्वे, प्रा. आबासाहेब सावंत, राजेंद्र कीर, अंकुश सुर्वे, प्रसाद कोलते, भाई बेर्डे, कोंडगाव ग्रामपंचायत सदस्या श्रद्धा शेट्ये, ग्रामपंचायत सदस्या केतकर, ग्रामपंचायत सदस्य चव्हाण, एसटी कर्मचारी कोळी, सतीश शेडगे, प्रल्हाद शिंदे, कनावजे तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने प्रवासी उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या सोहळ्यात नव्या बसस्थानकामुळे परिसरातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम होईल आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

