( बुरंबी /वार्ताहर )
विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच देवरुख येथील राम मंदिराचे विश्वस्त वसंत उर्फ अप्पा शेंबेकर यांचे आज पहाटे चार वाजता रत्नागिरी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते.
समाजकार्य, धार्मिक कार्य आणि हिंदुत्ववादी चळवळीत त्यांनी आयुष्यभर सक्रिय सहभाग घेतला होता. देवरुख परिसरात ते अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते.
अप्पा शेंबेकर यांनी मृत्यूनंतर देहदान करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांचा मृतदेह डेरवण येथील रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आला. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रत्नागिरी भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष सौ. रश्मी सप्रे यांच्या ते पिताश्री होत.

