(रत्नागिरी / वार्ताहर)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, सामाजिक उपक्रम आणि पक्ष विस्तारासंदर्भात या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर SIR मतदार यादीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रत्येक मतदान केंद्रावर पक्षाचे बूथ लेव्हल एजंट (BLA) तातडीने नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. मतदार यादीत नवीन मतदारांची नोंदणी तसेच त्रुटी दुरुस्तीचे काम गतीने करण्यावर भर देण्यात आला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तसेच युवासेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशेष विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा संपर्क प्रमुख श्री. सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार असून, रत्नागिरी, लांजा, संगमेश्वर, चिपळूण आणि राजापूर तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार १३ जून २०२६ रोजी देवरुख येथील मराठा भवन येथे करण्यात येणार आहे. यावेळी वाहन क्षेत्रात ‘सर्वोत्कृष्ट कस्टम ब्रोकर (निर्यात)’ हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री. सुरेश कदम यांचा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
बैठकीदरम्यान रत्नागिरी दक्षिण जिल्हाप्रमुख श्री. दत्ता कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले. तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घराघरांत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे सांगितले.
या बैठकीला जिल्हाप्रमुख श्री. दत्ता कदम, चिपळूण-संगमेश्वर विधानसभा संपर्क प्रमुख श्री. सुरेश कदम, उपजिल्हाप्रमुख श्री. रवींद्र डोळस, चिपळूण तालुका प्रमुख श्री. बळीराम गुजर, लांजा तालुका प्रमुख श्री. युवराज हांदे, युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत, रत्नागिरी शहर प्रमुख श्री. प्रशांत साळुंखे, चिपळूण शहर प्रमुख श्री. सचिन (भैय्या) कदम, महिला उपजिल्हा संघटक सौ. सायली पवार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

