(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील गावखडी येथे गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते चषक व रोख रकमेची पारितोषिके प्रदान करण्यात आली.
क्रिकेट स्पर्धेत ‘रूद्र इलेव्हन’ संघाने विजेतेपद पटकावले, तर ‘सुपर मेस्त्री’ संघ उपविजेता ठरला. स्पर्धकांचा आणि खेळाडूंचा उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात गौरव केला. कार्यक्रमासाठी भव्य रंगमंच उभारण्यात आला होता. या रंगमंचाला ‘सोमेश्वर-जुगादेवी-जाकादेवी-मानूबाई’ असे नामकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाला गावखडी गुरववाडी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गुरव, उपाध्यक्ष विजय गुरव, खजिनदार सुधाकर गुरव, स्थानिक अध्यक्ष रामचंद्र गुरव, दत्ताराम गुरव, जितेंद्र गुरव, प्रकाश गुरव, धनंजय गुरव, हेमंत गुरव तसेच प्रमुख पाहुणे मंगेश गुरव आणि गुरव ज्ञाती समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार गुरव यांनी केले, तर उपस्थितांचे स्वागत विजय गुरव यांनी केले. अध्यक्षीय भाषणात राजेंद्र य. गुरव यांनी सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच मुलांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेमार्फत अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
(छायाचित्र : दिनेश पेटकर, गावखडी)

