( संगमेश्वर / प्रतिनिधी )
सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे ३ मे रोजी आयोजित इंस्ट्रुमेंटल गीत रामायण या नावीन्यपूर्ण संकल्पनेवरील कार्यक्रमासोबतच आयोजित कला दालन आर्ट फेस्टिवल या विविध अंगी चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी सरस्वती – नटराज- गणेश पूजन करून करण्यात आले. याप्रसंगी सभापती प्रीती सुर्वे, नगरसेविका पूजा पवार, मेधा कुलकर्णी इत्यादी प्रतिनिधी मान्यवर रत्नागिरी नगर परिषदेतर्फे तर कला क्षेत्रातून ज्येष्ठ चित्रकार रवींद्र मुळे, विष्णू परीट आणि संगीत क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व हेरंब जोगळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
रत्नागिरीतील श्रुती व यशोदीप कयाळ यांच्या आर्ट आणि क्राफ्ट (स्टेशनरी) आणि कलादालन (आर्ट मटेरियल आउटलेट) या कन्सेप्टिव्ह आउटलेटच्या माध्यमातून “एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ ” या संत वचनाला आदर्श मानून परिचयात आलेले कलाकार, चित्रकार आणि हॉबी आर्टिस्ट यांच्या सहयोगातून सदर चित्र प्रदर्शनाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
सर्व कलाकारांना एक व्यासपीठ मिळवून देऊन त्यांच्या त्यांच्या परीने परंतु एक दर्जेदार एकत्र कलाकृती संमेलन रत्नागिरी सारख्या ठिकाणी उभारण्यात यावे आणि रत्नागिरीतील तमाम कलाकारांनी एकत्र येऊन अशा स्वरूपाचे उपक्रम करण्याची प्रेरणा मिळावी अशा संकल्पनेने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सगळ्यात कौतुकाची गोष्ट रत्नागिरी नगर परिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी सुद्धा या कार्यक्रमाला एक कला रसिक आणि एक उत्तम शिक्षिका अशा स्वरूपात उपस्थिती लावून प्रदर्शनाचे निरीक्षण केले, प्रदर्शनातील सर्वच चित्रकृतींचे बारकाईने रसग्रहण केले. तसेच सभापती विजय खेडेकर आणि वैभवी खेडेकर यांनीही उपस्थिती लावून प्रदर्शनाचे निरीक्षण केले. प्रदर्शनातील सर्वच चित्रकृतींचे बारकाईने रसग्रहण केले.तसेच सभापती विजय खेडेकर आणि वैभवी खेडेकर यांनीही सदर कला प्रदर्शनाला भेट दिली वरील सर्व व्यक्तींनी कलाकारांना – आयोजकांना मनसोक्तपणे दाद देऊन पुढे सहकार्यासाठी आणि पाठिंब्यासाठी आश्वासितही केले.
प्रदर्शनात ज्येष्ठ आणि प्रसिद्ध चित्रकार रवींद्र मुळे, विष्णू परीट, स्वप्नाजा मोहिते , निलेश शिळकर तसेच चित्रकार आभा आणि ऋषिकेश भाटवडेकर, प्रांजल घोसाळे, श्वेता केळकर, रेझीन आणि मल्टीमीडिया आर्टिस्ट- देवयानी वाघदरे , वॅक्स आर्ट- अपूर्वा कथलकर, स्टोन आणि टॅटू आर्ट – अजय पारकर, क्राफ्ट आर्ट- नरेंद्र घाणेकर, लीपन आणि मायक्रमी – रश्मी बंदरकर , मिनीचर व हॅन्ड मायक्रो कार्विंग -दीप्तेश पाटील तसेच डी कॅड कॉलेज देवरुख- चित्रकार -विक्रम परांजपे आणि इत्यादी नामवंतांनी सहभाग घेतला होता. आगम स्कूल ऑफ आर्ट – संदेश पालये इत्यादी नामवंतांनी सहभाग घेतला होता.
कला विषयक विविध प्रत्यक्ष भेटून अथवा ९९३०१२८४०८ या क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहन यशोदीप कयाळ यांच्याकडून करण्यात आले आहे.

