(चिपळूण / प्रतिनिधी)
श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिपळूण यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त कै. कमलाकरशेठ चितळे व्याख्यानमाला अंतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि. ६ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.
‘राष्ट्र पुरुषांचे आदर्श नव्या पिढीची जबाबदारी’ या विषयावर प्रा. नितीन बानगुडे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रंगमंच, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, मार्कंडी, चिपळूण येथे आयोजित करण्यात आला आहे. या व्याख्यानाचा लाभ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष मोहन मिरगल, कार्याध्यक्ष रमण डांगे, सचिव प्रभंजन पिंपुटकर आणि खजिनदार चंद्रशेखर सावले यांनी केले आहे..

