(चिपळूण)
सह्याद्री शिक्षण संस्थेअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, खेर्डी चिंचघरी सती विद्यालयाने पुन्हा एकदा शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवत जिल्हास्तरीय स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
युनिटेक कॉम्प्युटर यांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा मान उंचावला. इयत्ता बारावीतील अथर्व राजेशिर्के आणि इयत्ता नववीतील शेखर कांबळे यांनी प्रभावी प्रदर्शन करत तृतीय क्रमांक पटकावला.
या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, जिद्द आणि शिक्षकांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. संगणक शिक्षक श्री. संगम गायकवाड व सौ. सोनाली शिंदे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी मोलाचे ठरले.
या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार श्री. शेखरजी निकम, सेक्रेटरी श्री. महेश महाडिक, ज्येष्ठ संचालक श्री. शांताराम खानविलकर, सह्याद्री कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे चेअरमन व कार्याध्यक्ष श्री. अनिरुद्ध निकम, तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय वरेकर, उपमुख्याध्यापिका सौ. सुलोचना जगताप, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

