(मंडणगड)
मंडणगड तहसीलदार कार्यालयाच्या पथकाने गुरुवार (४ सप्टेंबर २०२५) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मोठी कारवाई करत अवैध वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त केले. ही वाहने तहसील कार्यालय, मंडणगड येथे आणण्यात आली असून, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही सुरू असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.
गुरुवारी रात्री गस्तीदरम्यान महसूल पथकास म्हाप्रळ–मंडणगड मार्गावर दोन तर कुंबळे–दहागाव मार्गावर एक डंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना आढळले. त्यानंतर तात्काळ कारवाई करत ही सर्व वाहने ताब्यात घेण्यात आली.
दरम्यान, सलग तीन दिवसांच्या सुट्टीमुळे कारवाई प्रक्रियेत विलंब झाला होता. सोमवारी (८ सप्टेंबर) सायंकाळी उशिरापर्यंत दंडात्मक कार्यवाही सुरू होती. महसूल विभागाच्या या धडक मोहिमेमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

