(जाकादेवी / संतोष पवार)
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत गुरुवार दि.३० रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत जाकादेवी विद्यालयाच्या सभागृहात विविध दाखल्यांच्या संदर्भात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय रत्नागिरी, तालुका मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांच्यावतीने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. खालगाव मंडळातील सर्व गावातील ग्रामस्थ व लाभार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले मिळू शकणार आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालय, रत्नागिरी तहसीलदार कार्यालय रत्नागिरी येथील अधिकारी वर्ग, तसेच जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, पंचायत समिती सदस्या सौ. नेहा गावणकर ,पंचायत समिती सदस्या सौ.अनुष्का खेडेकर आदी उपस्थित राहणार आहेत.
शिबीर स्थळी प्रलंबित फेरफार सातबारा मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी सातबारा आणि ८ अ वितरण, उत्पन्न रहिवाशी आणि जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र, भोगवटादार वर्ग २चे, वर्ग१ चे याबाबत आदेश वितरण, सामाजिक अर्थ सहाय्य योजनांची माहिती देणे व प्रलंबित योजनांचे लाभ मंजूर करणे, उत्पन्न दाखले वितरण, लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत फेरफार नोंद करून महिलेच्या नावाचा अद्यावत सातबारा वितरण, नवीन मतदार नोंदणी, मयत मतदारांची यादीतून नाव कमी करणे, इतर दुरुस्ती करणे, बँक खात्याशी आधार पॅन कार्ड संलग्न करणे,पिकपाणी ॲप,रेशनकार्ड,ॲग्रीस्टॅक बाबत माहिती, ई मोजणीसाठीचे मार्गदर्शन आणि मोजणीसाठी अर्ज स्वीकारणे इत्यादी सोयी सुविधा या शिबीरामध्ये मिळणार आहेत.
हा कॅम्प ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय जाकादेवी खालगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. खालगाव जाकादेवी पंचक्रोशीतील गरजूंनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी रत्नागिरी व तहसील कार्यालय रत्नागिरी यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

