(खेड)
खेड येथील शासकीय विश्रामगृहात भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा आमदार श्री. रवींद्र चव्हाण यांचे विशेष कार्य अधिकारी (OSD) श्री. संतोष साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ‘जनता दरबार’ उत्साहात पार पडला.
खेड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या, अडचणी आणि विविध मागण्यांना योग्य व्यासपीठ मिळावे तसेच त्या राज्य शासनापर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने या जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांचे प्रश्न ऐकून त्यावर मार्ग काढण्याबरोबरच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
“सर्वसामान्यांच्या समस्या सोडवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, अशा उपक्रमांद्वारे नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले जाईल,” असे यावेळी सांगण्यात आले. नागरिकांचा विश्वास, प्रेम आणि पाठिंबा याच्या बळावर जनसेवेचा हा प्रवास पुढेही अधिक जबाबदारीने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी भाजपा नेते तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, विद्यमान नगरसेविका सौ. वैभवी खेडेकर, भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक गटनेते श्री. रहिम सहिबोले, भाजपा खेड शहराध्यक्ष श्री. भालचंद्र (नंदू) साळवी, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष श्री. संजय आखाडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस अँड. मिलिंद (दादू) नांदगांवकर, भाजपा खेड तालुकाध्यक्ष श्री. ऋषिकेश मोरे, भाजपा अल्पसंख्यांक खेड शहराध्यक्ष श्री. नईम चौगुले, भाजपा सोशल प्रमुख सर्वेश पवार यांच्यासह ओवैस चौगुले, स्वराज गांधी, प्रणव मापुस्कर, अक्षय सनगरे, प्रदीप भोसले, विजय गुप्ता आणि खेड तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

