( गावखडी / वार्ताहर )
रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गावखडी येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या वतीने आयोजित अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा उत्साहात पार पडला.
श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तसेच गुरुमाऊली गुरुदेव दास दिगंबर महाराज यांच्या आशीर्वादाने ही पालखी राजापूर तालुक्यातील कशेळी येथे आज (गुरुवार, दि. 23 एप्रिल 2026) रोजी सकाळी 11.30 वाजता ढोल-ताशांच्या गजरात दाखल झाली. पालखी आगमनावेळी “श्री स्वामी समर्थ” नामघोषाने परिसर भक्तिमय झाला होता.
यानंतर सकाळी 11.30 वाजता नामस्मरण, दुपारी 1 वाजता महाआरती आणि दुपारी 1.30 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
सोहळा यशस्वी करण्यासाठी नंदकुमार फोडकर, विश्वास फोडकर आणि गुरुनाथ फोडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
(छायाचित्र : दिनेश पेटकर, गावखडी)

