(विल्ये /अमित कांबळे)
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती यांच्या विद्यमाने जागतिक विश्व विद्यापीठांनी विविध पदव्या देऊन विभूषित केलेले भारतीय जनसामान्यातील महामानव बोधीसत्व विश्वरत्न प.पू. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ वा जयंती महोत्सव मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी थिबा राजाकालीन बुद्ध विहार रत्नागिरी येथे साजरा करण्यात येणार आहे.
सकाळी ९:३० वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.सकाळी १०:३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात येणार आहे.
भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या प्रतिमांची शहरातून चित्ररथ व लेझीम पथकासह धम्म रॅली काढण्यात येणार आहे.ही धम्म रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जयस्तंभ -बाजारपेठ -गाडीतळ मार्गे शहर पोलीस स्टेशन, मच्छी मार्केट, जयस्तंभ, जेलरोड ते सभास्थळ थिबा राजाकालीन बुद्ध विहार अशी काढण्यात येणार आहे.दुपारी १ ते ३ यावेळी जाहीर धम्म मेळावा आयोजित करण्यात आला असून या धम्म मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी मुंबई येथील युवा व्याख्याते स्वप्नील कदम उपस्थित रहाणार आहेत. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय कार्य “या विषयावर ते अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करणार आहेत.
तरी रत्नागिरी तालुक्यातील बौद्धजन पंचायत समितीच्या विविध गावशाखांतील तमाम धम्म बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष प्रकाश रा.पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, सेक्रेटरी सुहास कांबळे, सहसचिव शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत, महिला मंडळाच्या अध्यक्षा ऋतुजा आंबुलकर, उपाध्यक्षा ऋतिका जाधव, चिटणीस दिया कांबळे, सहसचिव सान्वी कांबळे, कोषाध्यक्षा प्रज्ञा पवार यांनी केले आहे.

