(देवरुख / सुरेश सप्रे)
संगमेश्वर तालुक्यातील असुर्डे गावचे सुपुत्र व मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक श्रीधर मुकुंद (अण्णा) जाधव यांनी यांचे प्रदीर्घ काळ आजाराने काल रात्री दुख:द निधन झाले
मुंबई महापालिकांच्या शिवसेनेच्या माजी महापौर व
आक्रमक नगरसेविक श्रध्दा जाधव यांचे ते पती व युवासेना कार्यकारणी सदस्य पवन जाधव यांचे वडिल व रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रचना महाडीक यांचे ते बंधू होत.
दुसरी आज त्याचे पार्थिव अंत्य दर्शनासाठी दुपारी ०१.०० ते ०३.०० या वेळेत ओमकार वेदा, ग. द. आंबेकर मार्ग, राष्ट्रीय मिल मजदूर संघ कार्यालय जवळ, भोईवाडा येथे ठेवण्यात आले. अंत्ययात्रा दुपारी ३.०० वाजता निघणार आहे.
संगमेश्वर चिपळूण विधानसभा निवडणुकीत मतदार संघातील उबाठा शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी, युवा सेना, महिला आघाडी त्याचप्रमाणे तमाम तालुकावासीयांचे वतीने मृतात्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

