(नाणीज/ वार्ताहर)
नाणीजधाम येथे श्रीराम नवमीचा पावन उत्सव पारंपरिक पद्धतीने व अत्यंत धार्मिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी जगद्गुरु श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पवित्र उपस्थितीने सोहळ्याला विशेष तेज प्राप्त झाले. ‘राम जन्मला का ग सख्ये, राम जन्मला’ या भक्तिमय गीताने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
भक्तगणांनी मोठ्या श्रद्धा व भावनेने पाळणा सोहळा साजरा करत श्रीरामाचे जन्मोत्सवाचे क्षण अनुभवले. आरती, नामस्मरण आणि जयघोषांच्या वातावरणात प्रभू श्रीरामाला जोजवण्यात आले.या सोहळ्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती. सर्वत्र भक्तिमय, मंगलमय आणि आनंददायी वातावरण निर्माण झाले होते.

