(रत्नागिरी)
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या झेप महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वाढीसाठी गेले तीन वर्षापासून उद्योजकता करंडक सुरू झाला. पावसचे जयंतराव देसाई उद्योजक करंडक नावाने ओळखला जातो. त्यासाठी दहा हजार रोख बक्षीस सुद्धा दिले जाते. यावर्षी 18 उद्योजक ग्रुपने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, सर्व ग्रुपची तीन दिवसांमध्ये २०८७४२ विक्रमी विक्री झाली.
नवउद्योजक ग्रुपची कार्यशाळा महाविद्यालयामध्ये इंटरपेनर्शिप मॅनेजमेंट विषय शिकवणारे प्राध्यापक डॉ.आनंद आंबेकर यांनी घेतली होती नवउद्योजकांसाठी पार्टनर ची भूमिका काय असू शकते, आपल्या प्रॉडक्टची किंमत किती असावी त्याचे प्रेसेंटेशन कसे असावे, वस्तूंची जाहिरात करण्यासाठी कोणत्या प्रकारे प्रयत्न कराल स्टॉलचे योग्य ठिकाणी विक्री केंद्र कसे असावे. यासंदर्भात सविस्तर दोन तासाची कार्यशाळा झाली. नवउद्योजकांना वैयक्तिक सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. याचाच परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या कल्पना आणि मार्गदर्शन यामुळे जे महोत्सवांमध्ये यावर्षी विक्रमी विक्री झाले यासाठी मयुरेश पंडित आणि परेश गुरव या प्राध्यापकांनी विशेष सहकार्य केले.
फूड स्टॉल मध्ये प्रथम क्रमांक आणि जयंतराव देसाई करंडक लव अँड फर्स्ट बाईट ( नुपूर मराठे निशा लिमये वैदेही लोखंडे ) यांनी पटकावला द्वितीय क्रमांक मंच स्टॉप (बुशरा कोंडकरी असदुल्ला खान ) तृतीय क्रमांक मॅजिक स्क्वेअर चार्ट स्क्वेअर (वेदांत सावर्डेकर अस्मिता खानविलकर हर्ष मराठे सौरीश कळशेकर चैत्राली ओक)
प्रॉडक्ट सेल मध्ये प्रथम क्रमांक सखी हँडमेड (संपदा महाबळ) द्वितीय क्रमांक हॅन्डक्राफ्टेड मॅजिक (लुब्ना डोंगरकर) तृतीय क्रमांक बिडेड लिब्स (रुद्राणी देवरुखकर)यांनी पटकावला. उद्योजकता मॅनेजमेंट ग्रुपचे प्रमुख विद्यार्थी सिद्धी शिंदे,सिद्धी कारेकर, अथर्व कारेकर, शर्विल संसारे होते.
सदर कार्यक्रमाला रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीमती शिल्पाताई पटवर्धन, उपकार्याध्यक्ष एडवोकेट विजय साखळकर,कार्यवाह श्री.सतीश शेवडे, सह कार्यवाह प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रायोजक आनंद देसाई यांनी शुभेच्छा दिल्या प्राचार्य डॉ.मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ.सुरेंद्र ठाकूरदेसाई, कला शाखा उपप्राचार्य डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखा च्या माजी उपप्राचार्य डॉ. यास्मिन आवटे, विज्ञान शाखा उपप्राचार्य डॉ.अपर्णा कुलकर्णी, झेप समन्वयक सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.आनंद आंबेकर विद्यार्थी सचिव सुमित पाध्ये, सांस्कृतिक प्रतिनिधी प्रसिद्धी सोनवणे उपस्थिती होते.

