(रत्नागिरी)
क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी यांच्या माध्यमातून क्षत्रिय मराठा प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू झाली. शनिवारी सकाळी शांतीनगर येथील शिवरुद्र टर्फ येथे नेरुळ, नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील क्रिकेट अकॅडमीचे सचिव आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी अविनाश गजानन साळवी यांच्या हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून दिमाखात झाले. क्षत्रिय मराठा प्रिमियर लीगचे हे पहिलेच वर्ष असून पुरुषांचे २४ संघ व महिलांचे ४ संघ असे २८ संघ या स्पर्धेत उतरले आहेत.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सौ. साळवी, क्षत्रिय मराठा मंडळाचे कार्याध्यक्ष राकेश नलावडे, प्रचारप्रमुख संतोष तावडे आणि उपाध्यक्ष प्राची शिंदे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम २४ संघमालक व त्यांच्या क्रिकेट संघाच्या कप्तानाला बोलवून त्यांचे स्वागत श्री. साळवी यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात आले. रत्नागिरी शहराजवळील सुमारे दहा गावांतील क्षत्रिय मराठा खेळाडूंना यात संधी मिळाली आहे. नाचणे, मिऱ्या, शिरगाव, टेंभ्ये, कसोप, कोळंबे, फणसोप, पाली, खेडशी, टिके, कासारवेली आदी गावातील आणि शहरी विभागातील संघ आहेत. उद्घाटन कार्यक्रमाचे निवेदन अमित कदम यांनी केले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना डी. वाय. पाटील क्रिकेट अॅकॅडमीचे सचिव अविनाश साळवी म्हणाले की, क्रिकेट प्रिमियर लीगचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. ५३ वर्षांपूर्वी मी रत्नागिरीला क्रिकेट खेळलो. त्यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन शिर्के होते, विजय तथा अप्पा साळवी, जयसिंगराव चव्हाण असे कार्यरत होते. त्या सर्वांनी मला जिल्ह्यासाठी खेळवले. माझ्यासोबत दीपक जाधव, अनंत सोलकर होते. आता माझी ५० ओव्हर्सची सेकंड इनिंग सुरू आहे. यात अनेकांना प्रोत्साहन देत क्रिकेटसाठी काही काम करतोय. सर्वजण क्रिकेटपटू होतील असं नाही, पण क्युरेटर, पंच, समालोचक, सहाय्यक होऊ शकतात. त्यामुळे अभ्यास करा, क्रिकेट खेळा, क्रिकेट खेळ तुम्हाला मान व धन मिळवून देईल.
या स्पर्धेमध्ये पुरुष विजेता संघाला रोख रक्कम २५ हजार रुपये आणि उपविजेता संघाला रोख रक्कम १५ हजार रुपये असे पारितोषिक व मॅन ऑफ द सिरीज विजेत्याला इलेक्ट्रिक बाईक बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. महिला विजेता संघाला ७७७७ रूपये व उपविजेत्या संघाला ५५५५ रूपये व चषक, वुमन ऑफ द सिरीज किताब विजेत्या महिलेला १५ हजार रुपयांची पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. बक्षिस वितरण समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून नगराध्यक्ष सौ. शिल्पा सुर्वे उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी स्पोर्ट्स लाईव्ह यु ट्यूब चॅनेलवर या सर्व स्पर्धेचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे.
संघमालक व संघाचे नाव
कौमुदी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स- कणाद वॉरियर्स, ओमेगा स्टेशनरी २.०- शिवभक्त मराठा, झाडगाव, आय.जी.एस- नवलाई नाचणे, सतिश साळवी- महालक्ष्मी खेडशी, कणाद कोचिंग क्लासेस- कालभैरव झाडगाव, नवलाई गृप- जय शिवराय पाली, गुरुदत्त बागवे- स्वयंभू निरुळ, आशाताई साळवी- नवलाई-पावणाई, मिर्या, त्वमेय सप्लायर्स- जय भैरी म्हसोबा, जाकि-मिर्या, प्रतिक देसाई- जगदंब कासारवेली, वेदगंध अॅग्रो- मराठा वॉरियर्स, साई नगर, टेकनिर्माण इफ्रास्ट्रक्चर – जय भैरी, टेंभ्ये, सिध्दीविनायक कन्स्ट्रक्शन- यंग बॉईज, निरुळ, सौ. विभावरी साळवी- नागेश्वर बागवाडी, श्रीमहालक्ष्मी कन्स्ट्रक्शन अॅण्ड सप्लायर्स- लक्ष्मीकेशव, फणसोप, हॉटेल आमंत्रण- लक्ष्मीकेशव, कसोप, राहुल बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स- जय महाराष्ट्र, फणसवळे, नंदकिशोर चव्हाण- श्री गणेश, नाचणे, सुरेशराव सुर्वे- जय भैरी कुवारबाव, चिंतामणी एन्टरप्रायझेस- मराठा योध्दा, खेडशी, राजेंद्र घाग- मोरया स्पोर्टस, कारवांचीवाडी, सावंत एलिवेटर- निलतारा, पेटकिल्ला, शिवार अॅग्रो टुरिझम- आरुष स्पोटर्स, खेडशी, क्षत्रिय मराठा मंडळ – क्षत्रिय मराठा मंडळ, क्षत्रिय मराठा मंडळ- तोरणा टायटन्स- महिला संघ, शिवनेरी- महिला संघ, रायगड रायडर्स- महिला संघ, रत्नदुर्ग वॉरियर्स- महिला संघ.

