(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिनानिमित्त भक्तीमय वातावरणात उत्साहपूर्ण कार्यक्रम पार पडला. आज (शुक्रवार, दि. २० मार्च २०२६) रोजी सकाळी ९ वाजता श्री स्वामी समर्थांची पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी १० वाजता स्वामींच्या पादुकांवर अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा काढण्यात आली. यानंतर दुपारी १२.३० वाजता आरती पार पडली आणि दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांना भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून दर्शनाचा लाभ घेतला. मठ परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेर्वी मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
फोटो
1.मेर्वी श्री स्वामी समर्थ मठात प्रगट दिनानिमित्त पालखी प्रदक्षिणा; सोबत मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर व अन्य मान्यवर.
2. प्रगट दिनानिमित्त मेर्वी मठात दर्शनासाठी जमलेली भक्तांची गर्दी.
(छायाचित्र : दिनेश पेटकर, गावखडी)

