(रत्नागिरी)
क्षत्रिय मराठा मंडळ, रत्नागिरी यांच्या माध्यमातून क्षत्रिय मराठा प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येत्या दि. २१ आणि २२ मार्च शिवरुद्र टर्फ, शांतीनगर येथे आयेाजित करण्यात आले आहे. या लीगचा उद्घाटन सोहळा शनिवारी दि. २१ रोजी सकाळी ९.०० वाजता नेरुळ नवी मुंबई येथील डी. वाय. पाटील क्रिकेट अकॅडमीचे सचिव आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी अविनाश गजानन साळवी यांच्या हस्ते होणार आहे.
या स्पर्धेमध्ये पुरुषांचे २४ संघ व महिलांचे ४ असे एकूण २८ संघ सहभागी झाले आहेत. या प्रिमियर लीग स्पर्धेला 24 संघमालकांचे प्रायोजकत्व लाभले आहे. रत्नागिरी शहराजवळील सुमारे दहा गावांतील क्षत्रिय मराठा खेळाडूंना यात संधी मिळाली आहे. नाचणे, मिऱ्या, शिरगाव, टेंभ्ये, कसोप, कोळंबे, फणसोप, खेडशी, टिके आदी गावातील आणि शहरी विभागातील संघ आहेत. क्षत्रिय मराठा मंडळाने संघांची निवड करून प्रायोजित केले आहे.
संघमालक व संघाचे नाव
कौमुदी बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स- कणाद वॉरियर्स, ओमेगा स्टेशनरी २.०- शिवभक्त मराठा, झाडगाव, आय.जी.एस- नवलाई नाचणे, सतिश साळवी- महालक्ष्मी खेडशी, कणाद कोचिंग क्लासेस- कालभैरव झाडगाव, नवलाई गृप- जय शिवराय पाली, गुरुदत्त बागवे- स्वयंभू निरुळ, आशाताई साळवी- नवलाई-पावणाई, मिर्या, त्वमेय सप्लायर्स- जय भैरी म्हसोबा, जाकि-मिर्या, प्रतिक देसाई- जगदंब कासारवेली, वेदगंध अॅग्रो- मराठा वॉरियर्स, साई नगर, टेकनिर्माण इफ्रास्ट्रक्चर – जय भैरी, टेंभ्ये, सिध्दीविनायक कन्स्ट्रक्शन- यंग बॉईज, निरुळ, सौ. विभावरी साळवी- नागेश्वर बागवाडी, श्रीमहालक्ष्मी कन्स्ट्रक्शन अॅण्ड सप्लायर्स- लक्ष्मीकेशव, फणसोप, हॉटेल आमंत्रण- लक्ष्मीकेशव, कसोप, राहुल बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स- जय महाराष्ट्र, फणसवळे, नंदकिशोर चव्हाण- श्री गणेश, नाचणे, सुरेशराव सुर्वे- जय भैरी कुवारबाव, चिंतामणी एन्टरप्रायझेस- मराठा योध्दा, खेडशी, राजेंद्र घाग- मोरया स्पोर्टस, कारवांचीवाडी, सावंत एलिवेटर- निलतारा, पेटकिल्ला, शिवार अॅग्रो टुरिझम- आरुष स्पोटर्स, खेडशी, क्षत्रिय मराठा मंडळ – क्षत्रिय मराठा मंडळ, क्षत्रिय मराठा मंडळ- तोरणा टायटन्स- महिला संघ, शिवनेरी- महिला संघ, रायगड रायडर्स- महिला संघ, रत्नदुर्ग वॉरियर्स- महिला संघ.
या स्पर्धेमध्ये पुरुष विजेता संघाला रोख रक्कम २५ हजार रुपये आणि उपविजेता संघाला रोख रक्कम १५ हजार रुपये असे पारितोषिक व मॅन ऑफ द सिरीज विजेत्याला इलेक्ट्रिक बाईक बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. तसेच महिला संघातील वुमन ऑफ द सिरीज किताब विजेत्या महिलेचा पैठणी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. महिला विजेता व उपविजेता संघाला ट्रॉफी देण्यात येणार आहे. हा बक्षिस वितरण नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते होणार आहे. सर्व संघाना प्रोत्साहन देण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे क्षत्रिय मराठा मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

