( रत्नागिरी / एजाज इब्जी )
रत्नागिरी तालुक्यातील मजगांव येथील गो प्रेमी मुकादम यांनी संगमेश्वर धामणी येथील अण्णा पाध्ये यांच्याकडून २००० साली एक गायीचे वासरू आणले होते. तिचे नामकरण पिंकी नांवाने केले. तिची उत्तम जोपासना केल्याने २००२ साली या पिंकीची पहिली प्रसुती डाॅ. पाडवी यांच्या हस्ते पार पडली. तेव्हापासून पिंकी घरातील सभासदच झाली. घरातील प्रत्येक बालकाची लाडकी झाली. पिंकी ची प्रत्येक वर्षी न चुकता प्रसूती होत होती. त्यामुळे घरातील बालकांचाही आनंद वाढतच जात होता. घरातील सर्वांनी एक एक वासरु तर आपल्याच नांवे करून घेतले होते.
२०२५ च्या जानेवारी च्या सुरुवातीलाच पिंकी ची २० वी प्रसुती डाॅ. शंतनू घोघरे यांच्या हस्ते झाली. यावेळी घरातील सर्व मंडळी आणखी आनंदी झाली. घराला उत्सवासारखे रुप आले. या गो उत्सवाला भेट देण्यासाठी मजगांव चे सरपंच फैयाज मुकादम, उपसरपंच शरीफ इब्जी, डाॅ. शंतनू घोघरे सामाजिक कार्यकर्ते एजाज इब्जी यांनी मकबूल मुकादम आणि त्यांच्या सौभाग्यवती शाईस्ता मुकादम आणि संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा दिल्या.