(गणपतीपुळे / वैभव पवार)
जिल्हास्तरीय थ्रो बॉल स्पर्धेत जिंदल विद्या मंदिर रत्नागिरी प्रशालेने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत कप्तान अक्षरा निकम, वैदेही दुर्गवली, भक्ति दुर्गवली, गार्गी घनवटकर, मुग्धा घाटगे, मानसी घाटगे, रिद्धी पाटील, वैशाली बेळगावकर या खेळाडूंचा समावेश होता. या सर्वच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली.
या संघाला शाळेचे क्रिडाशिक्षक रणजित जाधव व मिथिला मोरे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. संघाच्या विजयी यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सोनिया शेट्टी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी देखील अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा व्यक्त केल्या.

