(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 हे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. रत्नागिरी मध्य मंडळामध्ये माभळे, संगमेश्वर येथे अभियान घेण्यात आले. भाजपा रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी या एक दिवसीय निवासी प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन केले.
यावेळी जिल्हा सरचिटणीस श्री. ओंकार फडके, रत्नागिरी मध्य मंडल तालुकाध्यक्ष प्रतिक देसाई, अभियान संयोजक संकेत कदम, तालुका सरचिटणीस राजेश आंबेकर, तालुका कोषाध्यक्ष श्री दिपक आपटे तालुका चिटणीस राजेंद्र कळंबटे महिला जिल्हा सरचिटणीस सौ नुपूरा मुळ्ये, महिला तालुका अध्यक्षा सौं. सुचिता नाचणकर, जि.उपाध्यक्ष श्री. संदीप नाचणकर, रत्नागिरी कृषी बाजार समिती सभापती श्री.संदिप सुर्वे, उपाध्यक्षा सौं. दीप्ती फडके, श्री. प्रसाद भिडे, जिल्हा उपाध्यक्षा सौं.अनुश्री आपटे, सौं.सरिता आंबेकर, सौं. मेधा देवस्थळी, सौं. सपना सावंत, सौं. अनुष्का शेलार,रोहिणी सुर्वे, मनाली सुर्वे, सौं. माधवी भिडे, श्री. विनय मुरकर, श्री. मंगेश साळवी, श्री. राकेश कदम, श्री. प्रमोद शेट्ये, मयूर निकम आदी पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पक्ष हा कोणत्या विचारसरणीच्या आधारे चालतो, त्याचा आत्ता पर्यंतचा इतिहास काय हे कार्यकर्त्याला समजावे यासाठी असे वर्ग आयोजित केले आहेत असे जिल्हा अध्यक्ष श्री. प्रशांत यादव यांनी सर्वांना मार्गदर्शन करताना सांगितले.
विविध विषयानुसार अभ्यासू वक्ते मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. वैचारिक अधिष्ठान तसेच कार्य विस्तार आणि आमची दृष्टी या विषयावर डॉ. अजित जोग, इतिहास आणि विकास या विषयावर श्री. उदय करमरकर, बुथ व्यवस्थापन श्री.ओंकार फडके, सोशल मीडिया श्री. निलेश मराठे, केंद्र व राज्य सरकारच्या योजना डॉ. श्री. हृषीकेश केळकर तसेंच आपली कार्य पद्धती या विषयावर सौं. नुपुरा मुळ्ये यांनी मार्गदर्शन केले. अभियानाची सुरुवात ही राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत तसेच प्रशिक्षण गीत म्हणून करण्यात आली.अतिशय उत्तम आणि शिस्तबद्ध पद्धतीने हे प्रशिक्षण संपन्न झाले.

