(रत्नागिरी / वार्ताहर)
रत्नागिरी येथील होंडा या जगप्रसिद्ध दुचाकी वाहनांचे अधिकृत डीलर मे. जागृत होंडा येथे ह शाईन १२५ लिमिटेड एडिशन चे अनावरण ग्राहकाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले, होंडा या जगप्रसिद्ध दुचाकी निर्माते असलेली शाईन १२५ लिमिटेड एडिशन हि शृंखला बाजारात आणली आहे. मोटारसायकल श्रेणी मध्ये आव्वल असणाऱ्या शाईन १२५ यामध्ये आता नवीन व स्टायलिश लूक असलेली शाईन १२५ लिमिटेड एडिशन हि गाडी ग्राहकांना उपलब्ध झाली असून नुकतेच त्याचे अनावरण जागृत मोटर्स चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजेंद्र जोशी व सौ. रेश्मा जोशी व प्रथम ग्राहक यांचे हस्ते करण्यात आले.
शाईन १२५ लिमिटेड एडिशन चे प्रमुख ३ वैशिठ्ये म्हणजे स्टायलिश ग्राफिक्स, नवीन आलोय व्हील्स, नवीन लूक व नवीन आकर्षक रंगात उपलब्ध असलेली हि शाईन १२५ लिमिटेड एडिशन आता रत्नागिरी येथे उपलब्ध झाली आहे.
यावेळी बोलताना जागृत मोटर्स चे मॅनेजिंग डायरेक्टर श्री राजेंद्र जोशी व सौ. रेश्मा जोशी यांनी होंडा ह्या आंतराष्ट्रीय ब्रँड ची वाहने आता रत्नागिरीकरांच्या सेवेत जागृत होंडा तर्फे आणू शकलो व जागृत होंडा बद्दल असलेली ग्राहकाचा विश्वास याबद्दल आम्ही सर्व ग्राहकाच्या विश्वासाला पात्र ठरलो याचा अभिमान आहे असे म्हणाले.
यावेळी जागृत होंडा यांचे प्रतिनिधी, स्टाफ व ग्राहक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच हि नवीन शाईन १२५ लिमिटेड एडिशन पाहण्याकरिता जागृत होंडा येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

