(देवरुख / सुरेश सप्रे)
बँक ऑफ इंडियामधील फेडरेशन ऑफ बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन या संघटनेने आपले प्रलंबित असलेले प्रश्न तडीस नेण्यासाठी बँक व्यवस्थापना विरुद्ध आंदोलनात्मक कार्यक्रम घोषित केला आहे. त्याची सुरुवात म्हणून दि. १७ मार्च २०२६ रोजी संपुर्ण देशभर झोनल ऑफिस समोर “ मास निदर्शने” करण्याचे ठरले आहे तसेच दि. २४ मार्च २०२६ रोजी संपुर्ण देशभर झोनल ऑफिस समोर ”धरणे” आयोजित केलेले असून दि. ३० मार्च २०२६ रोजी “देशव्यापी संप” जाहीर केला आहे. या संपाच्या दिवशीही देशभर बँक ऑफ इंडियाच्या सर्व झोनल ऑफिस समोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
हे आंदोलन व संप पुढील मुद्द्यांवर असेल :
१) ग्राहकांना चागल्या व उत्तम प्रकारे सेवा देता यावी यासाठी क्लार्क, शिपाई व आर्मगार्ड यांची पुरेश्या प्रमाणात भरती करावी. २) बँकेने कायम स्वरूपी नोकऱ्यांचे आउटसोर्सिंग करू नये. ३) बँकेने रोजंदारी काम करणाऱ्या (डेलीवेजीस) कामगारांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी. ४) बँकेने औद्योगिक विवाद कायद्याचे उल्लंघन करू नये. तो पाळणे आवश्यक आहे. ५) बँक व्यवस्थापन व संघटना यामध्ये १५ नोव्हेंबर २०१४ व २७ डिसेंबर २०२१ रोजी अंतर्गत समझोता करार झालेला आहे त्याचे उल्लंघन न करणे, त्याचे वचन पाळणे व वितरण करणे. ६) बँक व्यवस्थापनाने कामगार विरोधी धोरण राबवू नये. ७) बँकेला होणाऱ्या नफ्यातील वाटा काही प्रमाणात कर्मचाऱ्यांना देण्यात यावा.
वरील तीनही दिवशी संघटनेमार्फत दिवशी बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस, शिवाजीनगर, रत्नागिरीच्या आवारात “निदर्शने” करण्यात येणार आहेत, अशी माहीती विनोद कदम अध्यक्ष बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियन पुणे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्धारे दिली
निदर्शनाचा तपशील पुढीलप्रमाणे :
दिनांक : १७ मार्च २०२६ “निदर्शने” वेळ : सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत
दिनांक : २४ मार्च २०२६ “धरणे आंदोलन” वेळ : सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत
दिनांक : ३० मार्च २०२६ संपाच्या दिवशी “निदर्शने” वेळ : सकाळी १० ते २ वाजेपर्यंत
ठिकाण : बँक ऑफ इंडिया आंचलिक कार्यालय, शिवाजीनगर, रत्नागिरी.

