( रत्नागिरी )
कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेमार्फत महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात पौष्टिक पराठा बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. अपर्णा पास्ते, द्वितीय सौ. प्रज्ञा फडके, तृतीय सौ. रोहिणी गुण्ये यांनी आणि उत्तेजनार्थ सौ. मिहिका कार्लेकर यांनी यश मिळवले. तर रव्याचे पाकतील लाडू बनवण्याच्या स्पर्धेत प्रथम सौ. सुप्रिया आठल्ये, द्वितीय सौ. सुप्रिया पाटणकर, तृतीय सौ. स्पृहा आठल्ये व उत्तेजनार्थ सौ रोहिणी गुण्ये यांनी क्रमांक मिळवले.
नाचणे येथील गोखले भवन येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन्ही गटात ६५ स्पर्धक महिला सहभागी झाल्या. स्पर्धेत चिपळूण, पूर्णगड व रत्नागिरीतील स्पर्धक सहभागी झाल्या. कार्यक्रमाची सुरुवात स्वागताने सौ. अदिती भावे यांनी केली. सूत्रसंचालन सौ. अर्चना जोशी यांनी केले. दीपप्रज्वलन रवींद्र रानडे, श्री. गानू, सौ. अनुजा आगाशे व परीक्षक सौ. शितल पटवर्धन आणि सौ. ऋता पंडित यांनी केले.
वर्मोर सोल्युशन्स कंपनीच्या उत्पादनांची माहिती श्रीमती सेजल व स्वरश्री जोगळेकर यांनी दिली. सर्व स्पर्धकांना संस्थेकडून सहभागाबद्दल भेटवस्तू देण्यात आली. परीक्षकांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
स्पर्धकांना परीक्षकांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. शमा प्रभुदेसाई यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष अनंत आगाशे, रवींद्र रानडे, श्री. गानू, सौ. तेजा मुळ्ये, देवदत्त पेंडसे यांचे सहकार्य लाभले. सौ. अनुजा आगाशे, सौ. गानू, सौ. राधा रानडे, सौ. सिधये, सौ. श्रेया रानडे, सौ. अर्चना जोशी, सौ. मानसी अभ्यंकर, सौ. पूर्वा साने, सौ. श्रद्धा पटवर्धन, सौ. उर्मिला पटवर्धन, सौ. शमा प्रभुदेसाई, सौ. करकरे, सौ. स्नेहा बीजर्गी, सौ. श्रद्धा जोशी, सौ. पौर्णिमा पेंडसे, सौ. अदिती भावे यांचे सहकार्य लाभले.

