(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जिंदल विद्यामंदिर सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.या निकलामध्ये दहावीच्या वर्गा मधून प्रथम क्रमांक कु. अथश्री पाटील द्वितीय क्रमांक कु. दर्ष राजे तृतीय क्रमांक कु. झयान खान फडनाईक चतुर्थ क्रमांक कु.झिया संसारे पाचवा क्रमांक कु.तनया काळोखे आणि तसेच याच प्रशालेच्या बोर्डाच्या जाहीर झालेल्या बारावी परीक्षेत
१२ वी वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक कु. लाईबा माखजणकर द्वितीय क्रमांक कु. गौरिश गावडे तृतीय क्रमांक कु. हेतवी पटेल तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक कु. आदित्य चव्हाण द्वितीय क्रमांक कु. मनस्वी कांबळी तृतीय क्रमांक कु. खुशी परमार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. त्राप्ती वराठे यांनी यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले. त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. दवे सर यांनी सुद्धा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जिंदल एज्युकेशन ट्रस्ट कडून सुद्धा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.