(संगमेश्वर / दिनेश अंब्रे)
संगमेश्वर तालुक्यातील माभळे (पुनर्वसन, सकाळनगर) येथे वास्तव्यास असलेले प्रतिष्ठित नागरिक श्री. अशोक आत्माराम भाटकर (वय ७५) यांचे रविवारी, १ मार्च २०२६ रोजी अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
मूळचे संगमेश्वर येथील रहिवासी असलेले भाटकर हे अत्यंत प्रेमळ, सरळमार्गी आणि हसतमुख स्वभावामुळे परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने सकाळनगर व माभळे परिसरात दुःख व्यक्त केले जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून आणि नात असा परिवार आहे.

