(रत्नागिरी / प्रतिनिधी)
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया (भारतीय बौद्ध महासभा- व्हि एस मोकळे प्रणित) या संस्थेच्या कार्याला गती देण्याच्या उद्देशाने रत्नागिरी तालुका शाखेची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या बैठकीत तालुका अध्यक्षपदी विश्वास रामा कांबळे (रा. कापडगाव) यांची निवड करण्यात आली.
याच बैठकीत तालुका महासचिवपदी राजेंद्र दत्ताराम जाधव (रा. नाखरे), कोषाध्यक्षपदी प्रकाश कांबळे (नाणीज), तालुका उपाध्यक्षपदी मोहन सावंत (रा. पाली) यांची निवड करण्यात आली. महिला आघाडीमध्ये तालुका प्रमुखपदी सिद्धी सुधीर सावंत, महिला विभाग सचिवपदी रोहिणी संजय सावंत तसेच शितल सुनील कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली. नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण महाराष्ट्र राज्याचे महासचिव रमेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सी. ए. जाधव, जिल्हा कोषाध्यक्ष गौतम कांबळे, जिल्हा महिला प्रमुख भारती कांबळे, कापडगाव येथील बुद्धविहार ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
नव्या कार्यकारिणीने संघटन अधिक सक्षम, सक्रिय आणि समाजाभिमुख करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल कापडगाव ग्रामस्थांनी मान्यवरांचे स्वागत करून भोजनाची व्यवस्था केली. उत्साही वातावरणात झालेल्या या बैठकीचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला.

