(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील पावस भागात चांदोर फाटा येथे निष्काळजीपणे दुचाकी चालविताना झालेल्या अपघातात स्वाराचा मृत्यू झाला. श्रीमंत आप्पासाहेब बडची (वय ३६, सध्या निरुळ चिरेखाण; मूळ ऐशीळी, ता. अथणी, जि. बेळगाव, कर्नाटक) असे मृताचे नाव आहे.
गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोकरे यांच्या घरासमोर हा अपघात घडला. हेल्मेट न घालता वेगाने वाहन चालवित असताना नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी तुकाराम किलारी यांच्या फिर्यादीवरून पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

