(जाकादेवी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील जि.प.पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा आगवे poतर्फे फुणगूस या शाळेतील उपक्रमशील, उच्चशिक्षित असलेले शिक्षक श्री.पांडुरंग शेजाळ यानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या राज्यस्तरीय पाञता परीक्षेत ( सेट) शिक्षणशास्त्र या विषयात यश संपादन केले.
श्री.पांडुरंग शेजाळ हे गेली अनेक वर्ष नवोदय, शिष्यवृत्ती, नासा, इस्ञो इ.स्पर्धा परीक्षेचे उत्तम मार्गदर्शनकरत आले आहेत. श्री. शेजाळ यांचे विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमधून निवडले गेले आहेत. ते विद्यार्थी व पालकप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यानी यापूर्वी D.Ed, B.A (Eng), B.A.(Eco), B.sc. B.Ed.M.Ed इ. उच्चतम पदव्या संपादन केल्या आहेत.
सेट उत्तीर्ण झालेले श्री. शेजाळ यांची शिक्षणाविषयी जिद्द, आकांक्षा, मेहनत पाहून त्यांचे परिसरातून तसेच शिक्षणप्रेमींमधून अभिनंदन होत आहे.

