आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्याकडे होणारा दुर्लक्ष गंभीर आजारांना आमंत्रण देतो. त्यातीलच एक धोकादायक पण कमी ओळखला जाणारा विकार म्हणजे रक्त घट्ट होणे, ज्याला वैद्यकीय भाषेत हायपरकोअग्युलेबिलिटी (Hypercoagulability) असे म्हणतात. वेळीच लक्ष दिलं नाही, तर ही स्थिती हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि रक्तसंचरणाशी संबंधित गंभीर गुंतागुंती निर्माण करू शकते.
रक्त घट्ट झालं तर शरीरात नेमकं काय होतं?
तज्ज्ञांच्या मते, जेव्हा रक्त नेहमीपेक्षा अधिक जाड व चिकट होतं, तेव्हा त्याचा प्रवाह मंदावतो. यामुळे ब्लड क्लॉट (रक्ताची गाठ) तयार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
- ही गाठ हृदयापर्यंत पोहोचली तर हार्ट अटॅक
- मेंदूपर्यंत गेली तर स्ट्रोक
- रक्तप्रवाह मंद झाल्याने ऑक्सिजन व पोषकद्रव्यांचा पुरवठा कमी होतो
- परिणामी ऊतींचं नुकसान (Tissue Damage) होऊ शकतं
रक्त घट्ट होण्याची प्रमुख कारणं
कार्डिओलॉजिस्ट आणि हेल्थ एक्स्पर्ट्सनुसार रक्त घट्ट होण्यामागे खालील कारणं असू शकतात:
- शरीरात पाण्याची कमतरता (Dehydration)
- हाय कोलेस्ट्रॉल आणि जास्त चरबी
- पॉलिसायथेमिया व्हेरासारखे आजार (लाल रक्तपेशी वाढणे)
- प्रोटीन C किंवा प्रोटीन S ची कमतरता
- कॅन्सर, धूम्रपान, निष्क्रिय जीवनशैली
- सतत एसीमध्ये राहणं किंवा अतिथंडी, ज्यामुळे नसा आखडतात
ही कारणं सामान्य वाटली, तरी परिणाम मात्र अत्यंत गंभीर ठरू शकतात.
Blood Clotting ची सुरुवातीची लक्षणं ओळखा
बहुतेक वेळा सुरुवातीला लक्षणं जाणवत नाहीत. मात्र क्लॉटिंग सुरू झाली की शरीर काही संकेत देतं:
- वारंवार डोकेदुखी, चक्कर येणे
- श्वास लागणे, थकवा
- अस्पष्ट दिसणे, डोळ्यांत वेदना
- त्वचेवर सतत खाज किंवा निळसरपणा
- हाता-पायात कळा, सूज, वेदना
- उच्च रक्तदाब
- महिलांमध्ये मासिक पाळीत जास्त रक्तस्राव
ही लक्षणं सातत्याने दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
रक्त घट्ट झाल्यास कोणते धोके संभवतात?
- हार्ट अटॅकचा धोका वाढतो
- स्ट्रोक येण्याची शक्यता
- किडनी फेल्युअर
- हृदयाची कार्यक्षमता कमी होणे
- रक्तसंचरणात गंभीर अडथळे
वेळीच उपचार न झाल्यास ही स्थिती प्राणघातक ठरू शकते.
Blood Clotting असल्यास कोणत्या भाज्या टाळाव्यात?
तज्ज्ञांच्या मते, रक्तात गुठळ्या होण्याची समस्या असल्यास Vitamin K जास्त असलेल्या भाज्या मर्यादित किंवा टाळाव्यात:
- पालक
- केल
- ब्रोकोली
- सोयाबीन
- दुधी (विशेष परिस्थितीत)
कोणताही आहार बदल डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय करू नये.
रक्त पातळ ठेवण्यासाठी काय कराल?
- दररोज नियमित व्यायाम
- पुरेसं पाणी पिणं
- धूम्रपान, तेलकट व अतिमिठाचे पदार्थ टाळा
- हळद, आलं, लसूण, कोरफड, Vitamin-E असलेले पदार्थ (डॉक्टरांच्या सल्ल्याने)
- वेळोवेळी आरोग्य तपासणी
तुम्ही ब्लड थिनर्स किंवा इतर औषधं घेत असाल, तर कोणताही घरगुती उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
रक्त घट्ट होणं हा शांतपणे वाढणारा धोका आहे. शरीर देत असलेले संकेत ओळखून वेळीच उपचार घेतले, तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारखे मोठे धोके टाळता येऊ शकतात.

