(रत्नागिरी)
कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा रत्नागिरी यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व, कथाकथन व काव्यलेखन स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष आनंद शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी प्राचार्य मधुरा पाटील, जाधव मॅडम, तालुकाध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड, विनायक हातखंबकर, अंजली पिलणकर, डॉ. आनंद आंबेकर आणि विद्याधर कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत विनायक हातखंबकर यांनी केले तर प्रास्ताविक प्रा. चंद्रमोहन देसाई यांनी मांडले. स्पर्धा युवागट व खुला गट अशा दोन विभागांत घेण्यात आल्या.
वक्तृत्व स्पर्धा
युवागट:
प्रथम – सेजल भार्गव मेस्त्री
द्वितीय (विभागून) – गौरवी मंदार ओळकर, केतकी लक्ष्मीकांत केतकर
तृतीय – रिया सुनील वालम
खुला गट:
प्रथम – जयंत गोपाळ फडके
द्वितीय – मानसी मंगेश चव्हाण
तृतीय (विभागून) – आभा राजेंद्र घाणेकर, दामोदर परशुराम लिंगायत
कथाकथन स्पर्धा
युवागट:
प्रथम – गौरवी मंदार ओळकर
द्वितीय – दिप्ती प्रकाश दोरखडे
तृतीय – सेजल भार्गव मेस्त्री
खुला गट:
प्रथम – उमेश नामदेव मोहीम
द्वितीय – मानसी मंगेश चव्हाण
तृतीय (विभागून) – जयंत गोपाळ फडके, संपत भाऊराव पाटील
उत्तेजनार्थ – संतोष शांताराम गार्डी
विशेष उल्लेखनीय कथा – नरेंद्र गावंड
काव्यलेखन स्पर्धा
युवागट:
प्रथम – रत्नेश अनिल कांबळे
द्वितीय – ईशिका अजय हरचकर
तृतीय – श्रावणी प्रविण धनावडे
खुला गट:
प्रथम – दत्ताराम शावरप्पा कांबळे
द्वितीय – अमित शंकर पवार
तृतीय – मानसी मंगेश चव्हाण
सर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
स्पर्धांचे परीक्षण विनायक हातखंबकर, विशाखा सकपाळ, अनंत जाधव, डॉ. निधी पटवर्धन आणि प्रकाश सावंत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. आनंद आंबेकर, विनायक हातखंबकर, चंद्रमोहन देसाई, अंजली पिलणकर, श्रद्धा बोडेकर, मिरगल सर आणि मानसी चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.
कार्यक्रमात मधुरा पाटील, आनंद शेलार आणि प्रा. चंद्रमोहन देसाई यांनी मार्गदर्शन केले. मानसी चव्हाण व गौरवी ओळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रद्धा बोडेकर यांनी केले तर आभार विद्याधर कांबळे यांनी मानले.

