(गावखडी / वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी येथील श्री स्वामी समर्थ मठात पौर्णिमेच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांची सुरुवात शनिवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७ वाजता श्री स्वामी समर्थांची विधिवत पूजा करून होणार आहे. सकाळी ८ वाजता स्वामींच्या पादुकांवर अभिषेक करण्यात येईल. दुपारी १२ वाजता पालखी प्रदक्षिणा, दुपारी १२.३० वाजता आरती तर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविक व भक्तगणांनी घ्यावा, असे आवाहन मेर्वी श्री स्वामी समर्थ मठाचे पुजारी श्री. सहदेव पावसकर यांनी केले आहे.

