(रत्नागिरी)
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य – रत्नागिरी विभागामार्फत मंगळवार, दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले रत्नदुर्ग व किल्ले पूर्णगड येथे
खडा पहारा मोहीम राबविण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे साक्षीदार असलेल्या या किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण व नववर्षाचे स्वागत शिवप्रेरणेने करण्याच्या उद्देशाने ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे. मद्य, फटाके, गैरप्रकार व असामाजिक कृत्यांना आळा घालून किल्ल्यांची पवित्रता जपण्यासाठी ही रात्रभर चालणारी पहारा मोहीम राबविण्यात येणार आहे.
ही मोहीम सायं. ६:०० वाजल्यापासून पहाटे ३:०० वाजेपर्यंत सुरू राहणार असून, गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, शिवप्रेमी व स्वयंसेवक यामध्ये सहभागी होणार आहेत.
नववर्षाचे स्वागत दारू-धिंगाण्यात न करता इतिहासाची जपणूक करत, स्वराज्याच्या विचारांशी निष्ठा राखून करण्याचे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

