(राजापूर / तुषार पाचलकर)
रत्नागिरी जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन, रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित जिल्हा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा दि. २७ जानेवारी २०२६ रोजी डेरवण येथील एस. व्ही. जे. सी. टी. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये यशस्वीरीत्या पार पडल्या. या स्पर्धांमध्ये V फिटनेस अॅण्ड मार्शल आर्ट ट्रेनिंग सेंटर, पाचल येथील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत संस्थेचा नावलौकिक वाढवला.
स्पर्धेत १० वर्षांखालील गटात गोळाफेक (शॉटपुट) प्रकारात ध्रुव प्रवीण किंजळस्कर यांने प्रभावी खेळ सादर करत द्वितीय क्रमांक पटकावला. तो जि. प. शाळा, तुळसवडे नं. १ येथील विद्यार्थी आहे. १० वर्षांखालील मुलींच्या गोळाफेक प्रकारात शाल्मली शैलेंद्र बंदसोडे (जि. प. शाळा, पाचल बोद्धवाडी) हिने चतुर्थ क्रमांक मिळवला, तर प्रशिक दत्तात्रय गायकवाड (कोंडतिवरे) याने स्पर्धेत सहभाग नोंदवला.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रेम प्रकाश हाणकर (ओझर नं. १) याने ३०० मीटर धावणे स्पर्धेत सहभाग घेतला. याच गटात गोळाफेक प्रकारात वेदांत बाबू जाधव (ओझर नं. १) याने चतुर्थ क्रमांक पटकावला, तर साई राजेश गुरव (ओझर नं. १) याने सहभाग नोंदवला.
१४ वर्षांखालील लाँग जंप प्रकारात वीर दत्तात्रय किंजळस्कर (तळवडे नं. १) याने पाचवा क्रमांक मिळवला, तर संकल्प संजय कदम (तळवडे नं. १) याने स्पर्धेत सहभाग घेतला.
या सर्व खेळाडूंच्या यशामागे प्रमुख प्रशिक्षक श्री. युवराज विलास मोरे, सह प्रशिक्षक श्री. शैलेंद्र रघुनाथ बंदसोडे तसेच टीम मॅनेजर श्री. दत्तात्रय शहाजी गायकवाड, श्री. दादासो महादेव ठोंबरे व प्रवीण किंजळस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

