(बारामती)
अपडेट : बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह विमानातील एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात, अजित पवार, विमानाचे वैमानिक, सहवैमानिक, सुरक्षा अधिकारी, वैयक्तिक सहाय्यक (PA), एक तांत्रिक कर्मचारी अशा एकूण सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
राज्यभर शोककळा
या घटनेची बातमी पसरताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने बारामतीकडे रवाना झाले. सर्व राजकीय पक्षांनी आपले कार्यक्रम रद्द करत शोक व्यक्त केला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी भीषण अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे विमान जवळच असलेल्या शेतात कोसळले आणि लगेचच आग लागली.
आज सकाळी ८:०० वाजता मुंबईहून विशेष विमानाने उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीकडे रवाना झाले होते. बारामतीत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी त्यांच्या चार जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते.
“बारामतीत लँडिंग करताना विमानाचा अपघात झाला. या विमान अपघातातील घटनास्थळावर तीन मृतदेह आढळून आले आहेत. मात्र मृतदेहाची अद्यापही ओळख पटली नाही. हे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे,” अशी माहिती पुण्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप सिंग गिल यांनी दिली. अपघातग्रस्त विमानातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, विमानचालक कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाइट अटेंंडंट पिंकी माळी हे प्रवास करत होते.
हे विमान खासगी VSR कंपनीचं होतं. विमानात एकूण 6 प्रवासी प्रवास करत होते. हे विमान मुंबईतून सकाळी 08.10 वाजता निघालं होतं. त्यानंतर विमान बारामतीत सकाळी 08.50 ला पोहोचल्यानंतर हेलकावे खात कोसळलं. त्यानंतर विमानाचा भीषण स्फोट झाला.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आज बारामती जिल्ह्यात चार नियोजित सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या सभांसाठी अजित पवार हे सकाळीच मुंबईवरुन बारामतीकडे निघाले होते. मात्र सकाळी 08.45 वाजता लँडिंग करताना त्यांच्या विमानाला अपघात झाला.
विमान बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना नियंत्रण सुटल्यावर हे विमान धावपट्टीवर आदळले आणि नंतर शेतात कोसळले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कोसळताच विमानात आग लागल्याने परिसरात दूरवर धुराचे लोट दिसत होते. मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळासाठी संपूर्ण विमानतळ परिसर बंद करण्यात आला.
अपघाताची माहिती मिळताच आग्नेयसेना विभाग, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैयक्तिक सहाय्यक (PA) यांना विमानातून बाहेर काढण्यात आले. प्राथमिक माहिती नुसार अजित पवार यांना डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
लँडिंग करताना विमानाला अपघात झाला. पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक हे रणजित शिवतरे हे बारामती विमानतळावर पोहोचल्यावर अपघाताबाबत त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या अपघाताचे धक्कादायक व्हिडिओही आता समोर येत आहेत. ज्यामध्ये विमान जळाल्याचे दिसत आहे.
या भीषण अपघाताची बातमी पसरताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून अपघाताबद्दल माहिती घेतली. नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) कडून उच्चस्तरीय चौकशी केली जाणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार तांत्रिक बिघाडामुळे इंजिन निकामी झाले की इतर मानवी चूक झाली, याचा तपास होणार आहे.

