(मुंबई)
राज्यातील महायुती सरकारने शासकीय कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिककेंद्रित करण्यासाठी राबवलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शासकीय कार्यालयांची यादी प्रजासत्ताक दिनानिमित्त जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून ही माहिती दिली.
भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत (Quality Council of India) करण्यात आलेल्या सखोल मूल्यमापनानंतर राज्यातील विविध संवर्गांतील सर्वोत्तम शासकीय कार्यालयांची निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत या यादीची घोषणा केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत करण्यात आले. या मूल्यमापनात कार्यालयांची अधिकृत वेबसाईट, ‘आपले सरकार’ प्रणालीचा वापर, ई-ऑफिस प्रणाली, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सऍप चॅटबॉट, शासकीय कामकाजात AI आणि Blockchain तंत्रज्ञानाचा वापर तसेच GIS आधारित प्रणालींचा वापर अशा सात महत्त्वाच्या निकषांवर कामगिरी तपासण्यात आली.
या सर्व निकषांवर उल्लेखनीय आणि प्रभावी कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड प्रजासत्ताक दिनी जाहीर करताना आनंद होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्वोत्तम शासकीय कार्यालये पुढीलप्रमाणे:
– जिल्हाधिकारी कार्यालय – जळगाव
– पोलिस अधीक्षक कार्यालय – ठाणे ग्रामीण
– महानगरपालिका – पनवेल
– पोलिस आयुक्त कार्यालय – नाशिक
– विभागीय आयुक्त कार्यालय – नागपूर
– पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालय – नांदेड
– राज्यस्तरीय आयुक्तालय / संचालनालय – संचालक, तंत्र शिक्षण
– राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरण – महाराष्ट्र सागरी मंडळ
– मंत्रालयीन विभाग – सार्वजनिक बांधकाम विभाग
महाराष्ट्रातील अग्रक्रमानुसार शासकीय कार्यालये
सर्वोत्तम जिल्हाधिकारी (३६ पैकी) कार्यालयाचे नाव क्रमांक
१ जिल्हाधिकारी, जळगाव १८८.००
२ जिल्हाधिकारी, ठाणे १८६.७५
३ जिल्हाधिकारी, धाराशिव १८५.२५
४ जिल्हाधिकारी, लातूर १७९.२५
५ जिल्हाधिकारी, कोल्हापूर १७७.००
सर्वोत्तम पोलीस अधीक्षक (३४ पैकी) क्रमांक कार्यालयाचे नाव
१ पोलीस अधीक्षक, ठाणे (ग्रामीण) १६८.२५
२ पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण) १६१.००
३ पोलीस अधीक्षक, अकोला १४८.७५
४ पोलीस अधीक्षक, पुणे (ग्रामीण) १४५.००
५ पोलीस अधीक्षक, रत्नागिरी १४४.२५
सर्वोत्तम विभागीय आयुक्त (६ पैकी)क्रमांक सामान्यीकृत गुण ( 200)
१ विभागीय आयुक्त, नागपूर १५९.५२
२ विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर १५२.३८
(सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (३४ पैकी) या श्रेणीतील निकाल ८ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात येतील)
सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त (२९ पैकी) सामान्यीकृत गुण (200)
१ महानगरपालिका आयुक्त, पनवेल १८७.७५
२ महानगरपालिका आयुक्त, पुणे १८६.२५
३ महानगरपालिका आयुक्त, उल्हासनगर १८४.२५
४ महानगरपालिका आयुक्त, नवी मुंबई १८१.७५
५ महानगरपालिका आयुक्त, अमरावती १७९.५०
सर्वोत्तम पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक /उपमहानिरीक्षक (८ पैकी)
१ परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक, नांदेड १२१.२३
२ परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक, नागपूर १२०.८८
या उपक्रमामुळे शासकीय सेवा अधिक डिजिटल, कार्यक्षम आणि नागरिकांसाठी सुलभ होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले असून, ई-गव्हर्नन्सच्या दिशेने महाराष्ट्राने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

